Bandhkaam kamgar yojana smart card : नमस्कार, महाराष्ट्र मध्ये जे कामगार महाराष्ट्र इमारत व इतर कामगार मंडळामार्फत नोंदणीकृत कामगार आहेत अशा सर्व कामगारांना नोंदणी झाल्यानंतर मंडळामार्फत एक स्मार्ट कार्ड दिले जाते. पण बरेच असे कामगार आहेत ज्यांना बांधकाम कामगार मार्फत स्मार्ट कार्ड भेटलेले नाही किंवा कसे काढायचे हे त्यांना माहीत नाही आज आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत.
बांधकाम कामगारांचे ” बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड ” कसे करायचे ?
नमस्कार, आजच्या माहितीमध्ये आपण बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार मंडळाचे स्मार्ट कार्ड कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत ही माहिती आपण विविध स्टेप्स मध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल
- सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे कामगारांची नोंदणी करावी लागेल
- कामगारांची नोंदणी केल्यानंतर तसेच तुमचा अर्ज मंजूर झाला असा मेसेज आल्यानंतर तुम्ही बांधकाम कामगाराचे स्मार्ट कार्ड काढू शकता
- यामध्ये पहिली पद्धत अशी आहे की अर्ज मंजूर झाल्यानंतर आणि मंडळा ची जी फी आहे ती भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट च्या ऑप्शनपासून डाऊनलोड स्मार्ट कार्ड हा ऑप्शन दिसेल. हा ऑप्शन सर्वांनाच दिसतो असं काही नाही काही काही नाच दिसतो
- दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही तो फॉर्म घेऊन बांधकाम कामगारांच्या जिल्हा सुविधा केंद्र किंवा तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी जायचे आहे.
- तेथे गेल्यानंतर तो अर्ज त्यांना दाखवायचा आहे. अर्ज दाखवल्यानंतर आधार कार्ड मार्फत ते तुमचा अर्ज चेक करतील
- चेक केल्यानंतर तुमचा अर्ज बरोबर असल्या ची खात्री करतील त्यानंतर तुम्हाला तत्काळ मंडळा ची पावती आणि बांधकाम कामगारांचे स्मार्ट कार्ड तुम्हाला देतील
कामगार कार्डचे वैशिष्ट्ये आणि माहिती
- हे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड महाराष्ट्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाचे असल्याकारणाने ते खूप महत्त्वाचे आहे
- या कार्डवर तुमचा नोंदणी क्रमांक असतो/
- त्यानंतर त्या कार्डवरच तुम्हाला कोणत्या तारखेला हे कार्ड दिले ती माहिती त्या ठिकाणी असते
- या कार्डवर तुमचा फोटो तुमची जन्मतारीख हे सर्व बाबी त्याच्यामध्ये असतात
- त्यानंतर या कामगार कार्डवर तुम्ही कोणत्या तालुक्यातून तसेच कोणत्या जिल्ह्यातून अर्ज केल्यानंतर तुम्हाला भेटले आहे याबद्दल त्याच्यामध्ये स्पष्ट माहिती असते.
- हे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड ऑनलाइन सुद्धा चेक करता येतं त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल त्या ठिकाणी प्रोफाइल चेक करावे लागेल यामध्ये तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर लागेल एक ओटीपी टाकल्यानंतर तुमची प्रोफाइल लॉगिन होईल आणि तुमचे कार्ड चालू आहे का नाही याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड चे फायदे
- हे स्मार्ट कार्ड बांधकाम कामगार विभागाचे असल्याकारणाने त्याची विविध फायदे आहेत
- या कामगार कार्डवर तुमची सर्व माहिती दिलेली असते त्यामुळे कामगाराबद्दल संपूर्ण माहिती सहज आपल्याला कळते
- ज्याप्रमाणे आपल्याकडे आधार कार्ड आहे आधार कार्ड पहिल्यांदा संपूर्ण माहिती कळते त्याचप्रमाणे हे बांधकाम कामगार सुद्धा आहे या कार्डवर तुमची कामगार मंडळाकडे नोंदणी केल्यानंतर जी प्राथमिक माहिती पाहिजे असते ती सर्व यावर लिहिलेले असते.
- या कामगार स्मार्ट कार्ड मार्फत तुम्ही शासकीय तसेच मंडळामार्फत फायदे घेऊ शकता
- तुमच्याकडे ही स्मार्ट कार्ड असेल तसेच तुमची मुलं तर शिकत असतील तर तुम्ही यामध्ये स्कॉलरशिप चा फॉर्म भरून त्याचा फायदा घेऊ शकता यावर आपण डिटेल अशी माहिती टाकलेली आहे
- तसेच या स्मार्ट कार्ड मार्फत तुम्ही आरोग्य तपासणी आणि यावर उपचार सुद्धा घेऊ शकता
- शासनाचे कामगारांना जे विविध अनुदान असते ते सर्व या कार्डमार्फतच येतात
- मंडळ मार्फत जेवढे वेल्फेअर स्कीम आहेत सर्व या कार्डवरच दिले जातात त्यामुळे याचे महत्त्व असाधारण आहे.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?
- आधार कार्ड
- 90 दिवसाचे कामगाराची नोंदणी प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
- रेशन कार्ड ( आवश्यक असल्यास )
- बँक पासबुक ( आवश्यक असल्यास )
- इतर -आधार सहमती पत्र तसेच स्वघोषणापत्र (आवश्यक असल्यास )
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड संदर्भात मंडळा मार्फत महत्वपूर्ण सूचना
- हे स्मार्ट कार्ड ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ ‘ मार्फत दिले जात असल्याकारणाने त्याचे महत्त्व असाधारण आहे ते जपून ठेवावे.
- ते कोठेही गहाळ होणार नाही तसेच खराब होणार नाही याची दक्षता त्या कामगारांनी घेणे आवश्यक आहे.
- जर हे स्मार्ट कार्ड हरवले तसेच खराब झाले तर मंडळामार्फत दुसरे स्मार्ट कार्ड दिले जाते पण त्यासाठी शुल्क आकारले जाते याची एक प्रोसेस आहे यासाठी तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हे स्मार्ट कार्ड गहाळ झाल्याचे लेखी तक्रार नोंडावी लागेल त्यानंतर त्याची प्रत घेऊन तुम्ही जिल्हा सुविधा केंद्र मध्ये जाऊन किंवा तालुका सुविधा केंद्र मध्ये जाऊन त्यांच्याकडे जमा करून तसेच त्या कार्डची फी जमा करून तुम्हाला हे कार्ड दिले जाते.
- जर हे कार्ड तुम्हाला सापडल्यास तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा करू शकता किंवा हेल्पलाइन क्रमांक 1800-233-0233 यावर संपर्क करून ते पत्ता देतील त्यावर पोस्टाने पाठवा.