Maharashtra imarat Bandhkam Kamgar Yojana : बांधकाम कामगार क्षेत्र हे अतिशय धोकादायक मानले जाते, जिथे बांधकाम कामगारांना अनेक प्रकारच्या अपघातांचा सामना करावा लागतो. उंच ठिकाणी काम करत असताना पडणे, विजेचा धक्का बसणे तसेच यंत्रांच्या वापरामुळे होणारे अपघात किंवा विषारी गॅसचा शरीरावर परिणाम यांसारख्या घटनांमुळे अनेक वेळा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू होतो. अशा वेळी कामगाराच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट येते. या येणार्या संकटावर मात करण्यासाठी मंडळा मार्फत कुटुंबांना मदत करण्यासाठी इमारत बांधकाम कामगार योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश
बांधकाम कामगाराच्या अचानक मृत्यूमुळे तसेच त्याच्या कुटुंबावर येणारे आर्थिक संकट कमी करणे आणि त्यांना आधार देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र इमारत मंडळाने ठेवला आहे.Maharashtra imarat Bandhkam Kamgar Yojana
- मृत कामगाराच्या अंत्यसंस्कारासाठी 10,000 रुपये आर्थिक मदत.
- कुटुंबासाठी 5 वर्षांसाठी दरवर्षी 24,000 रुपयांचे सहाय्य.
- मृत कामगाराच्या अल्पवयीन मुलांसाठी शिक्षणासाठी दरमहा 1,500 रुपयांपर्यंत आर्थिक मदत.
- मुलींच्या विवाहासाठी 51,000 रुपयांची विशेष मदत.
योजने अंतर्गत पात्रता
- कामगार नोंदणी साठी अर्जदाराचे वय गट 18 ते 60 वर्षे असावे.
- अर्जदार महाराष्ट्रातील मूळ रहिवाशी असावा आणि 15 वर्षे सतत महाराष्ट्रात राहणे आवश्यक आहे.
- अर्जदार मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात कार्यरत किवा काम करणे गरजेचे आहे.
- कामगार मंडळाकडे नोंदणी असलेला कामगारच या योजने साठी पात्र राहील.
योजनेच्या अटी व शर्ती
- मृत्यू प्रमाणपत्र (सक्षम वैद्यकीय अधिकारी)
- आधार कार्ड तसेच पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- नोंदणी अर्ज असल्यास
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे फोटो (3)
- कामगार असल्याचा पुरावा (इंजिनिअर/ठेकेदार/ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र )
अर्ज प्रक्रिया
- संबंधित कामगार कार्यालयातून किंवा संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करा.
- अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा आणि सर्व कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा.
- आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येत आहे. Maharashtra imarat Bandhkam Kamgar Yojana
योजनेचा लाभ
- कुटुंबाला थोडा आर्थिक ताण कमी होतो.
- लाभाची रक्कम थेट बँक खात्यात DBT ने जमा होते.
- यामुळे मृत कामगाराच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक सहाय्य मिळते.
इमारत बांधकाम कामगार योजना ही योजना नोंदणी कृत बांधकाम कामगारांच्या कुटुंबांसाठी एक मोठा आधार ठरत आहे. नोंदणी कृत कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षितता देण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे.